ग्रामपंचायत लोगो

ग्रामपंचायत

घुरुपकोंड

एक ध्यास – गावचा विकास

लोगो

ग्रामपंचायत

घुरुपकोंड

© ग्रामपंचायत

घुरुपकोंड

ग्रामपंचायत घुरुपकोंड

गावाचा आढावा

                     महाराष्ट्राच्या नकाशात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारी-  ग्रामपंचायत घुरुपकोंड 

ग्रामपंचायत घुरुपकोंड हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले गाव आहे. 

 

सन् १९९३ पासून घुरुपकोंड ही स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आहे. घुरुपकोंड आणि सानेकोंड या दोन गावे मिळून ही ग्रामपंचायत स्थापन झाली आहे.

 

या ग्रामपंचायतीचे एकूण क्षेत्रफळ २६९.९३ हेक्टर असून, गावात अंदाजे १६५ घरटी व सुमारे ४४१ लोकसंख्या आहे. 

 

ग्रामपंचायतीने अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून लोकसहभागातून,  सामाजिक एकोपा, स्वच्छता आणि संवर्धन यांचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले आहे. 

 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२५ मध्ये आमच्या ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे, ज्यामुळे गावाच्या स्वच्छता व विकास उपक्रमांना गौरव लाभला आहे.

 

एकेकाळी अविकसित म्हणून ओळखली जाणारी ही ग्रामपंचायत आज समृद्धी, शाश्वत विकास आणि सामाजिक प्रगतीचे प्रतिक बनली आहे .

ग्रामपंचायत घुरुपकोंड हे नाव आता केवळ गावापुरते मर्यादित नाही, तर महाराष्ट्रात सकारात्मक बदल, स्वच्छता आणि विकासाच्या आदर्शासाठी ओळखले जाते.

 

सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये

गावातील प्रमुख देवस्थाने:
  • हनुमान मंदिर (घुरुपकोंड)
  • हनुमान मंदिर (सानेकोंड )
  • शिव शंकर मंदिर (घुरुपकोंड)
गावातील सामाजिक संस्था / मंडळे:
  • ग्रामस्थ मंडळ
  • महिला मंडळ
  • मुंबई मंडळ

शैक्षणिक स्थळ

  • रायगड जिल्हा परिषद शाळा, घुरूपकोंड
  • अंगणवाडी, घुरूपकोंड
  • मिनी अंगणवाडी –सानेकोंड

ग्रामपंचायतीच्या आसपासची ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची स्थळे:- 

स्थळ अंतर
मुरारबाजी देशपांडे समाधी - पिंपळकोंड १ किमी
सोमेश्वर महादेव मंदिर -पिंपळकोंड १ किमी
पांडव कालीन लेणी - गंधारपाले ६ किमी
चवदार तळे, महाड ६ किमी
क्रांती स्तंभ, महाड ६ किमी
विरेश्वर महाराज मंदिर, महाड ६.७ किमी
गरम पाण्याचे झरे - सव  १० किमी
राजमाता जिजाऊंची समाधी-पाचाड २७ किमी
रायगड किल्ला (छत्रपती शिवाजी महाराज समाधी)  २८ किमी
नरवीर तानाजी मालुसरे समाधी -उमरठ-पोलादपूर ३८ किमी
संत रामदास स्वामी महाराज समाधी- शिवथरघळ महाड ३८ किमी
प्रतापगड  ५० किमी
महाबळेश्वर ६५ किमी